"अतुल्य भंडारदरावाडी, पर्यटन समृद्ध भंडारदरावाडी "
भंडारदरावाडी , ता. इगतपुरी , जि. नाशिक
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
ग्रामपंचायतीतील ,ग्रामपंचायत अधिकारी , प्रशासक यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी
श्री बबन रामजी गोरे

प्रशासक
श्री ज्ञानेश्वर मोहनराव कऱ्हाळे
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
सर्वसाधारण माहिती
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या सर्वतीर्थ टाकेदच्या उत्तरेस सुमारे ७ कि.मी. अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले भंडारदरावाडी हे गाव आहे. हे गाव नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील शेवटचे गाव असून नाशिक शहराच्या आग्नेय दिशेस वसलेले आहे. नाशिकपासून वाडीवर्हे मार्गे सुमारे ५० कि.मी. तसेच देवळाली मार्गे सुमारे ४५ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. गावासाठी घोटी व भगूर या मुख्य बाजारपेठा उपलब्ध आहेत.
पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत भरविर बु., भंडारदरावाडी अंतर्गत असलेले हे गाव २६/०६/२०२५ रोजी विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत भंडारदरावाडी म्हणून स्थापन झाले. गावात जागृत देवस्थान असलेले जागमाता मंदिर प्रसिद्ध असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात तिसऱ्या मंगळवारी येथे यात्रा भरते.
भंडारदरावाडी गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भात हे येथील प्रमुख पीक असून कोरडवाहू क्षेत्रात भातासोबत टोमॅटो व सोयाबीन ही पिके घेतली जातात. बागायती क्षेत्रामध्ये टोमॅटो, कोबी, कांदा व इतर भाजीपाला तसेच गहू व हरभरा पिकवले जातात. काही ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने शेळीपालन, गुरेपालन व कोंबडीपालन करतात. तसेच काही ग्रामस्थ नाशिक व मुंबई येथे नोकरी व व्यवसायासाठी कार्यरत आहेत.
गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धामनगाव येथे सुमारे ११ कि.मी. अंतरावर असून आरोग्य उपकेंद्र भरविर खु. येथे ११ कि.मी. अंतरावर आहे. पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळगाव डुकरा येथे सुमारे १२ कि.मी. अंतरावर उपलब्ध आहे.
भंडारदरावाडी गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १११३.६१.४० हेक्टर असून यामध्ये शेती क्षेत्र ५४०.१६.३० हेक्टर, पोटखराब क्षेत्र ९.१९.२० हेक्टर, गावठाण क्षेत्र ८.६२.०० हेक्टर, वन क्षेत्र ५३१.३३.९० हेक्टर तसेच रस्ते व शिवार यांसाठी २४.३०.०० हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
जनगणना २०११ नुसार गावाची एकूण लोकसंख्या १९९५ इतकी असून त्यामध्ये १०३७ पुरुष व ९५८ स्त्रिया आहेत. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या १, अनुसूचित जमातीची लोकसंख्या १६९० व इतर प्रवर्गातील लोकसंख्या ३०४ इतकी आहे.
गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरावाडी (इयत्ता १ ते ७) असून त्यामध्ये २४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच घोरपडेवाडी येथे इयत्ता १ ते ५ पर्यंतची शाळा असून तेथे २७ विद्यार्थी आहेत. एकूण ४११ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी १४ शिक्षक कार्यरत आहेत. शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व मुतारी सुविधा उपलब्ध आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी गावातील विद्यार्थी भरविर बु., टाकेद बु., भगूर, घोटी, नाशिक व इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात.
गावात एकूण ३ अंगणवाडी केंद्रे असून त्यामध्ये २१४ लाभार्थी (० ते ६ वर्षे वयोगटातील) मुले-मुली आहेत. सर्व अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीत चालतात व प्रत्येक अंगणवाडीत एक कार्यकर्ती व एक मदतनीस कार्यरत आहे.
भंडारदरावाडी गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी उंचावरील ७५,००० लिटर क्षमतेचा तसेच जमिनीवरील ५०,००० लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. गावातील एकूण ३४७ कुटुंबांपैकी ३३० कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित १७ कुटुंबांकडे स्वतःची पाण्याची सोय आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने गावातील सर्व ३४७ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध आहे. त्यापैकी १०२ कुटुंबांचे सांडपाणी गटारीस जोडलेले आहे. ३१ कुटुंबांकडे शोषखड्डे असून १४४ कुटुंबांकडे परसबाग आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गावासाठी पोस्ट कार्यालयाची सुविधा भरविर बु. येथे सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. बँक सुविधा पिंपळगाव डुकरा येथे ११ कि.मी. अंतरावर असून तलाठी कार्यालय भरविर बु. येथे ३ कि.मी. अंतरावर उपलब्ध आहे.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
फोटो गॅलरी
