ग्रामपंचायत भंडारदरावाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

भंडारदरावाडी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ सर्वतीर्थटाकेदच्या उत्तरेस सुमारे ७ कि.मी. अंतरावर, डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य गाव आहे. हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेवटचे गाव असून नाशिक शहरापासून आग्नेय दिशेस वाडीवर्हे मार्गे ५० कि.मी. तसेच देवळाली मार्गे ४५ कि.मी. अंतरावर स्थित आहे. गावाच्या जवळच्या प्रमुख बाजारपेठा घोटी व भगुर आहेत. पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत भरविर बु. अंतर्गत असलेले भंडारदरावाडी गाव २६ जून २०२५ रोजी विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आले.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

तपशीलमाहिती
गावाचे नावभंडारदरावाडी
जिल्हानाशिक
तालुकाइगतपुरी
जवळचे तीर्थस्थळसर्वतीर्थटाकेद (७ कि.मी. उत्तरेस)
नाशिक पासून अंतरवाडीवर्हे मार्गे ५० कि.मी., देवळाली मार्गे ४५ कि.मी.
मुख्य बाजारपेठघोटी, भगुर
ग्रामपंचायत स्थापना दिनांक२६/०६/२०२५
प्रसिद्ध देवस्थानजागमाता मंदिर
यात्रामार्गशीर्ष महिन्यात तिसरा मंगळवार
मुख्य व्यवसायशेती
मुख्य पीकभात
इतर पिकेटोमॅटो, सोयाबीन, कोबी, कांदा, भाजीपाला, गहू, हरभरा
एकूण भौगोलिक क्षेत्र१११३.६१.४० हेक्टर
शेती क्षेत्र५४०.१६.३० हेक्टर
वन क्षेत्र५३१.३३.९० हेक्टर
गावठाण क्षेत्र८.६२.०० हेक्टर
लोकसंख्या (२०११)१९९५
पुरुष१०३७
स्त्री९५८
अनुसूचित जमाती१६९०
शाळाजिल्हा परिषद प्राथमिक शाळा (भंडारदरावाडी, घोरपडेवाडी)
अंगणवाडी
एकूण कुटुंब संख्या३४७
नळजोडणी कुटुंबे३३०
प्राथमिक आरोग्य केंद्रधामनगाव – ११ कि.मी.
पशुवैद्यकीय दवाखानापिंपळगाव डुकरा – ११ कि.मी.
पोस्ट ऑफिसभरविर बु. – ३ कि.मी.
बँकपिंपळगाव डुकरा – ११ कि.मी.
तलाठी कार्यालयभरविर बु. – ३ कि.मी.

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी
Scroll to Top